nana patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव निश्चित पण...; पटोलेंची माहिती

निवडणूक प्रक्रिया कशी होईल याची दिली माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सध्या मुंबईत सुरु आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया कुठंपर्यंत आली आहे, याबाबतची सविस्तर माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Name for post of Assembly Speaker is fixed Info provided by Nana Patole)

पटोले म्हणाले, काल कॅबिनेटची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा अध्यक्षच्या निवडीबाबतचं पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आलं आहे. यावर आज राज्यपालांकडून याला मान्यता मिळेल त्यानंतर तातडीनं निवडणुकीची प्रक्रिया सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावं आघाडीवर आहेत. याबाबत माहिती देताना पटोले म्हणाले, जसं निवडणुकीचं नोटिफिकेशन निघेल त्यानंतर तात्काळ उमेदवाराचं नाव घोषीत केलं जाईल. उमेदावाराचं नाव अंतिम झालेलं आहे, यासाठी काँग्रेस हायकमांड नोटिफिकेशनची वाट पाहत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पटोले म्हणाले, महाविकास आघाडीतील तिनही पक्षांमधून कोणाचाही आमच्या उमेदवाराला विरोध नाही. त्यामुळं आम्ही कोणाचंही नाव फायनल केलं तरी त्याला विरोध असणार नाही.

मंत्रीमंडळातील काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल होणार?

पटोले म्हणाले, मंत्रीमंडळातील फेरबदलांबाबत हायकमांड निर्णय घेईल. पण याबाबत सध्या जास्त काही सांगता येणार नाही. दरम्यान, २८ डिसेंबरपर्यंत ठरलेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचं कामकाज सुरु राहणार असून याच काळात अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT