Nana Patole Latest News sakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंकडे असलेलं संख्याबळ हा केवळ दिखावा - नाना पटोले

एकनाथ शिंदेंकडे असलेल्या संख्याबळ हा केवळ दिखावा, नाना पटोलेंच स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंकडे असलेल्या संख्याबळ हा केवळ दिखावा, नाना पटोलेंच स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंकडे असलेल्या संख्याबळ हा केवळ दिखावा आहे. दबावाखाली येऊन शिवसेनेनं ही भूमिका घेतली आहे, असं वक्तव्य कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केले आहे. खासदार राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संंवाद साधताना कॉंग्रसेची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही पटोलेंनी निशाणा साधला आहे. (Maharashtr Politics)

पटोले म्हणाले की, हा सर्व खेळ भाजपचा आहे. आकडेवारी समोर असूनही भाजपाने एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजप नेते बिळातून बाहेर यायला तयार नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला आहे. कोणतीही परिस्थिती असली तर कॉंग्रेस मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत राहणार असं स्पष्टीकरणही पटोलेंनी दिलं आहे. दरम्यान, बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस आमदारांनांही त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Nana Patole Latest News)

पुढे ते म्हणाले की, कॉंग्रसचे ४४ आमदार हे महाविकास आघाडी आणि शिवसेनेसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सत्ता मिळावीच असा आमचा अटट्हास नाही. त्यासाठी आम्ही कधीही कोणतंच सुत्र तयार केलं नव्हत. त्यामुळे सत्तेच कोणतही सूत्र तयार न करता प्रमाणिकपणे महाविकास आघाडीसोबत कॉंग्रेस राहिल असंही ते म्हणाले आहेत.

जनतेला भाजपचा हा सर्व खेळ माहिती आहे. शिवसेनेच्या माध्यमातून भाजपचा हा खेळ किंवा रणनीती जनतेला माहिती आहे. भाजप सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते. त्यांनी चालवलेला आहे ईडीचा खेळ आहे. ईडीला घाबरुनच ही उलथापालथ झाली आहे, असंही त्यांनी सूचित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University History: ५१२ एकरांवर उभं राहिलेलं ब्रिटिशकालीन ‘गव्हर्नर हाऊस’ कसं बनलं आजचं पुणे विद्यापीठ?

"मी 9 वर्षांचा असताना गाडी चालवायला शिकलो" सचिन पिळगावकर यांनी सांगितली बालपणीची आठवण

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिमेत 30 हजार दुबार मतदारांचा मुद्दा तापला; मनसे आक्रमक, ७ दिवसांचा अल्टिमेटम

Tharla Tar Mag BTS Video: अपघाताचं रहस्य उलगणारा सीन कसा शूट झाला? ठरलं तर मग मालिकेचा व्हिडिओ चर्चेत

Kharmaas 2025: खरमास कधी आणि का अशुभ मानला जातो; संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT