nana patole sakal
महाराष्ट्र बातम्या

Congress : काँग्रेसला मिळालं लोकसभेचं टार्गेट; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

संतोष कानडे

मुंबईः २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाना महाराष्ट्रासाठी टार्गेट दिलेलं असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलतांना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन १७ तारखेपासून सुरू होत आहे. विरोधी पक्षात काँग्रेसचे जास्त आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल. यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायला दिल्लीत आलोय.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. ९ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता राष्ट्रवादीकडे ४४ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदही आम्हालाच मिळणार. मोदी-फडणवीसांची हवा खराब झाली म्हणून अजित पवारांना आयात केल्याचा आरोप पटोलेंनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, मोदींनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांच्याकडेच आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. भाजपला लोकशाही मान्य नाही, आता राष्ट्रवादीचे बिनाखात्याचे मंत्री आहेत. जनता उपाशी आणि राज्य सरकार तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झालीय.

''काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आम्हाला खर्गे साहेबांनी २१ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचं टार्गेट दिलं आहे. त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकून आणू'' असा विश्वास नाना पटोले यांनी बोलून दाखवला. काँग्रेसला २१ जागा जिंकाव्या लागणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सध्या कंबर कसल्याची परिस्थिती राज्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT