chandrakant patil, Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोदींबद्दलचं वक्तव्य पटोलेंच्या अंगाशी येणार; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

फडणवीसांना काशीचा घाट दाखवू म्हणणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर कारवाई करा; चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: पोलिस दबावाखाली काम करत आहेत.नाशिकमध्ये तक्रार दाखल करून घ्यायला नकार दिला जात आहे. नारायण राणेंनी (Narauan Rane) केलेल्या वक्तव्यावर कारवाई केली जाते मग नाना पटोलेंवर का नाही? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, वादग्रस्त विधान करणं हा नाना पटोलेंचा (Nana Patole)स्वभाव आहे. त्यांच्या नेत्यांकडून त्यांनी गुण घेतले आहेत. हम करें सो कायदा अस राज्यातील चित्र सध्या आहे. आम्ही याची तक्रार राज्यपालांकडे करणार आहोत असेही ते म्हणाले.

नौटंकी करण्यात मोदी हुशार आहेत असं ते पंजाबमध्ये मोदींचा रस्तारोको घटनेवेळी बोलले होते. काल भंडारा मध्ये ते पुन्हा मोदींना शिव्या घालू शकतो, मारू शकतो असे म्हणाले. पटोले यांच्या विरोधात आमचे नेते राज्यभर आंदोलन करत आहेत. मात्र आमच्या तक्रारी पोलिस देखील ऐकून घेत नाहीत. गावोगावी पोलिस प्रशासन आम्हांला हैरान करत आहेत. आम्ही नानांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत.असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, नवाब मलिक म्हणतात देवेंद्र फडणवीस यांना काशीचा घाट दाखवणार. काशीचा घाट म्हणजे मृत्यू . म्हणजे नेमक काय दाखवणार? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिवाला धोका आहे. फडणवीसांना काशीचा घाट दाखवू म्हणणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT