Political esakal
महाराष्ट्र बातम्या

राहुल गांधींकडे व्हिजन, 2024 ला ते पंतप्रधान होतील - नाना पटोले

'भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, जनता आता याला कंटाळलीये'

सकाळ डिजिटल टीम

'भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, जनता आता याला कंटाळलीये'

सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय टोलेबाजी सुरु आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी द्रष्टे नेते असून २०२४ साली ते पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी द्रष्टे नेते असून २०२४ साली ते पंतप्रधान होती यात दुमत नाही. सध्या राजकीय वातावरण पाहिले तर अनेक गोष्टी समोर येत आहेत. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. याला आता जनता कंटाळली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे व्हिजन आहे. 2019 च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी आधीच दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेसचं (Congress) सांभाळू शकते म्हणून मी ट्विट केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले, जनता आता भाजपच्या (BJP) कामाला कंटाळली आहे. देशपातळीवर, भाजपला मोडीत काढायचे असल्यास काँग्रेस हाच एक पर्याय आहे. राज्य पातळीवरच्या पक्षांनी विचार केल्यास पर्यायाने भाजपला मदतच केली जाईल. यावेळी आमदारांनी सोनिया गांधीसोबत (Sonia Gandhi) भेट मागण्यासंदर्भात ते म्हणाले, मागील वेळी भाजप शिवसेना सरकारमध्ये आलबेल होतं. हे 3 पक्षाचे सरकार आहे, थोडं कमी जास्त होतं राहतं. आमदार आपल्या मतदार संघात काम करतात त्यांना पक्ष अध्यक्षांना भेटायची इच्छा असते ते भेटू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT