Narayan Rane On Maratha Reservation  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील पत्रकार परिषद रद्द; म्हणाले, पदापेक्षा जात, धर्म अन् देश...

Narayan Rane On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

Narayan Rane On Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचना जारी केली आहे. यानंतर ओबीस समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज त्यांची पुढील भूमिका मांडणार होते. दरम्यान राणे यांनी आजची ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत, "मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन" अशी माहिती दिली होती.

मुंबई येथे होणारी ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे माहिती राणे यांनी दिली आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्‍वाचे आहेत असेही नारायण राणे म्हणाले आहेत. दरम्यान पत्रकार परिषद रद्द करण्यामागील कारण राणे यांनी सांगितलेले नाही.

राणे नेमकं काय म्हणालेत?

"मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद रद्द करण्‍यात येत आहे. या विषयावर मला महाराष्‍ट्र शासनाला विनंती करावयाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण होणार नाही याची काळजी घ्‍यावी. स्‍वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्‍याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे"

"या सगळया नाजूक प्रश्‍नाचा महाराष्‍ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्‍ट्रामध्‍ये मराठा समाजाची संख्‍या 32 टक्‍के म्‍हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्‍याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्‍वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते." असेही नारायण राणे त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

मला डावललं गेलं, मी फोन केले तरीही... अभिनेत्याने सांगितलं 'पारू' मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाला- त्यांनी मला...

Cough Syrup For Kids: लहान मुलांना कफ सिरप देताय? थांबा...ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा

"तू महाराष्ट्राचा बिहार केलास.." मराठी अभिनेत्याचे गौतमी पाटीलला खडेबोल "साधी माणुसकी.."

SCROLL FOR NEXT