महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : आता 'या' तारखेला होणार नारायण राणेंचा भाजपप्रवेश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशास अडचणी येत होत्या. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाची नवी तारीख समोर आली आहे. नारायण राणे यांचा येत्या 2 ऑक्टोबरला भाजपप्रवेश होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी आपला पक्ष सोडत सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मात्र, नारायण राणेंचा भाजपप्रवेश होण्यात अनेक अडचणी येत आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांचा प्रवेश होणार अशा चर्चा होत्या. मात्र, भाजपप्रवेश झाला नाही. त्यानंतर आता नवा मुहूर्त पुढे आला आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्यांचा भाजपप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाला राष्ट्रील लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष असलेला शिवसेनेचा मोठा विरोध आहे. या विरोधातूनच त्यांचा भाजपप्रवेश अनेकदा लांबणीवर पडत आहे. त्यानंतर नवी तारीख पुढे आली आहे. त्यामुळे नारायण राणेंचा भाजपप्रवेश आतातरी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT