Sanjay Raut  Sanjay Raut
महाराष्ट्र बातम्या

भाजप मोदींना दोन तासही झोपू देणार नाही; संजय राऊतांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) खूप काम करतात. ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र, आता उरलेले दोन ताससुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असा बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे. त्यानुसार भाजपचे नेते कामाला लागल्याचा टोला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हाणला.

शिवसंपर्क अभियानासाठी संजय राऊत सोमवारी (ता. २१) रात्री नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले. त्यानुसार मराठवाडा व विदर्भात सगळेच खासदार कामासाठी निघाले आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. त्यामुळे तीन दिवस येथेच मुक्काम करणार आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

विदर्भ व मराठवाडामध्ये पक्षाचे जे संघटन आहे ते अधिक वाढावे, मजबूत व्हावे, लोकसभा व विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे यासाठी सगळे खासदार विदर्भ आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यात पोहोचतील. त्यांच्यासोबत मुंबई-ठाण्यातील २०-२० कार्यकर्त्यांची चमू असेल. चार दिवसानंतर आम्ही सगळे मुंबईला भेटू आणि उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करणार असल्याचे राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

मुंबईप्रमाणे नागपूरसुद्धा प्रिय

शिवसेनेची (Shiv Sena) ताकद फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रात आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवड्यात ती आखणी वाढवण्यात येणार आहे. मुंबईप्रमाणे नागपूरसुद्धा प्रिय आहे.

शिवसेनेची ताकद महाराष्ट्र, संघटना

पक्ष संघटनेचे काम ३६५ दिवस सुरू असते. सत्ता येते आणी जाते. राजकारणात बदल होत असतात. परंतु, संघटनेचा पाया मजबूत असणे कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचे असते. शिवसेनेची (Shiv Sena) ताकद महाराष्ट्र आणि संघटना आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात तपास यंत्रणा भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करतात आहे. त्यांना करू द्या, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहनचालकांसाठी मोठी बातमी! 1 वर्षात पाचवेळा वाहतूक नियम मोडला तर आता वाहन थेट ‘ब्लॅकलिस्ट’; वाहन परवानाही होणार निलंबित; केंद्राचे नवे राजपत्र, वाचा...

Raj Thackeray: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा बाजार: मनसे प्रमुख राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात, डॉक्टराने पक्ष बदलला की काय?

Solapur Tirupati flight: सोलापूर-तिरुपती विमानसेवेस पुण्याचा अडथळा; पुणे विमानतळावर स्लॉट मिळेना, स्टार कंपनीकडून सोलापुरात चाचपणी!

Accident News: कंटेनरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; कोपरगाव तालुक्यातील घटना, गुरुत्व शाळेत निघाला अन् अचानक थरकाप उडाला!

Bread Pakora Bites Recipe: चहासोबत परफेक्ट! वीकेंडला झटपट तयार होणारे ब्रेड पकोडा बाइट्स, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT