Ajit Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "राष्ट्रवादीनेच रचला अजितदादांच्या बदनामीचा कट"

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा जाळून टाकण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारा असंही आम्हाला फोनवरून सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीनेच अजितदादांच्या बदनामीचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

म्हस्के यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या आरोपांवर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी गुंडांवर बोलूच नये. त्यांच्यासोबत फक्त तेच लोक फिरतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलून संजय राऊत मातोश्रीवर आपलं वट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

निवडणुकीनंतर पुण्यात ठाकरे गटात भूकंप होणार आहे. ठाकरे गटातील सर्व नेते शिवसेनेत येणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावाही म्हसके यांनी यावेळी केला आहे.

तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना(शिंदेगट) विरुद्ध ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागण्याचं काम सातत्याने सुरु आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या या आरोपवर राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : '7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, नजर लागते म्हणून करायचा विशिष्ट विधी'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणूक! २० उमेदवारांनी माघार; दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होणार

Viral Video : शिक्षण आहे की व्यवसाय? इयत्ता दुसरीच्या पुस्तकांसाठी मोजावे लागले ९,००० रुपये; पालकाने मांडली व्यथा, व्हिडिओ व्हायरल

Hi Dear असा एक मेसेज अन् तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं; मोबाईल हॅक, नवा सायबर फ्रॉड नेमका आहे तरी काय? पाहा

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT