Police Recruitment  esakal
महाराष्ट्र बातम्या

Police Recruitment : पोलिस भरतीसाठी आजपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज; भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना संधी

Police Recruitment : शासनाच्या आदेशानुसार, राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची भरतीप्रक्रिया मंगळवार (ता.५) पासून सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Police Recruitment : शासनाच्या आदेशानुसार, राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची भरतीप्रक्रिया मंगळवार (ता.५) पासून सुरू होत आहे. भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. शासनाने राज्यभरात १७ हजार पोलिस शिपाई पदासाठी भरतीची घोषणा केली होती. त्यानुसार, शासनाने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. (nashik Online application for police recruitment marathi news)

यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ तर, नाशिक ग्रामीण पोलिस दलात ३२ रिक्त जागांसाठी भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. ५) सुरू होत आहे. इच्छुक युवकांना आपला अर्ज भरण्यासाठी policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. तसेच या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती दिलेली आहे.

उमेदवारांसाठी हेल्पलाइन

नाशिक शहर : ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४

नाशिक ग्रामीण : ०२५३-२३०९७०० किंवा २२००४५० (latest marathi news)

अशा आहेत रिक्त जागा

प्रवर्ग........... शहर आयुक्तालय...........ग्रामीण

- अ.जा..........१९........०३

- अ.ज...........२३........०७

-विजा(अ)......००........ ०१

- भ.ज.(ब)......००.......०१

- भ.ज.(क)......००......०१

- भ.ज.(ड)......००.....०१

- विमाप्र..........०४...... ०१

- इमाव...........०२.....०५

- एसई बीसी.....१२.....०३

- इडब्ल्यूएस......२०....०३

- खुला...........३८.......०६

एकूण ............११८.......३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT