Amravati’s former MP Navneet Rana admitted to the hospital; doctors advised 25 days of complete bed rest for recovery.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Navneet Rana Health Update : जाणून घ्या, नेमका काय त्रास होता? ; नागपूर येथील रूग्णालयात सुरू आहेत उपचार

Mayur Ratnaparkhe

Amravati Former MP Navneet Rana Hospitalized : अमरावतीच्या माजी खासदार भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना नागपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यानंतर फ्रॅक्चरही झाल्याने पायात एक छोटी गाठ निर्माण झाली होती.

यामुळे आता नवनीत राणा यांना अमरावतीमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शाम राठी यांच्या सल्ल्यानुसार नागपूरच्या नरेंद्रनगर येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या ठिकाणी नवनीत राणा  यांच्यावर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश मोटवानी यांनी शस्त्रक्रिया केली. याप्रसंगी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा हजर होते.

 प्राप्त माहितीनुसार पुढील साधारण २५  दिवस नवनीत राणा यांना डॉक्टारांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली आहे. तर नवनीत राणा यांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समजताच त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भेटीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

तर काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपाची ठार मारण्याची आणि लैंगिक हिंसेची धमकी मिळाली होती. हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे हे धमकीचे पत्र नवनीत राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानी पाठवण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे आठवड्याभरात ही दुसरी धमकी त्यांना मिळाली होती,  या वारंवार होणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

Interstate Car Racket : कार भाड्याने घ्यायचे, अन् बनावट कागदपत्रे बनवून विकायचे; आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश; दोघे जेरबंद!

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT