Nawab Malik, Anil Deshmukh run in Supreme Court for majority test Nawab Malik, Anil Deshmukh run in Supreme Court for majority test
महाराष्ट्र बातम्या

मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी फ्लोर टेस्टमध्ये (बहुमत चाचणी) मतदानाचा हक्क मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (ता. २९) त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या फ्लोअर टेस्टविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना या याचिकेवरही सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. (Nawab Malik, Anil Deshmukh run in Supreme Court for majority test)

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दोघांनी मतदानाचा हक्क मागितला होता. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन मते कमी झाले होते. तसेच विधान परिषदेच्या वेळेही नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. यावेळी त्यांना कोर्टाने मतदानाचा हक्क नाकारला होता.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मलिक आणि देशमुख यांना मतदानाचा हक्क नाकारल्याने महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे लागले होते, हे विशेष... आता बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे आमदारांसह मुंबईत दाखल होणार आहेत.

फ्लोर टेस्ट चाचणीच्या वेळी नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मतांची महाविकास आघाडीला गरज भासणार आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) त्यांना मतदानाची परवानगी देते की मागील दोन्ही निवडणुकीप्रमाणे यंदाही हक्क नाकारते हेच आता पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT