Nawab Malik  sakal media
महाराष्ट्र बातम्या

'टिपू सुलतान यांच्या नावावरुन भाजप जनतेची दिशाभूल करतंय'

टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या मालाड येथील क्रीडा संकुलच्या नावावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. भाजपाचे (BJP) आमदार अमित साटम आणि पालकमंत्री अस्लम शेख (Alslam shaikh) यांच्यातही आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान आता या वादात मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उडी घेतली असून टिपू सुलतान यांच्या नावावरून भाजप जनेतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणतात, टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. इंग्रजांशी लढत असताना टिपु सुलतान शहिद झाले. इंग्रजांशी लढत असताना कधीही त्यांनी हार मानली नाही. ते स्वातंत्र्यसेनाना होते. त्या काळात त्यांनी इंग्रजांना हादरुन सोडले होते. मात्र सध्या त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम भाजप करत आहे. कर्नाटकामध्येही (karnataka) भाजपने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा (B.S. Yediyurappa) यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईमध्येही (Mumbai) भाजपच्या नगरसेवकांनी टिपू सुलतान यांच्या नामकरणासाठी पत्र दिले होते. एखाद्या मैदानचे नाव टिपू सुलतान यांच्या नावाने झाले तर ते घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. याबाबतीत राष्ट्रपतींनीही संसदेत (Parliament) सभागृहाला संबोधित करत असताना टिपू सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल दिलेली माहिती भाजपाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT