Uddhav Thackeray Government Minister Agitation After Nawab Malik ED Custody e sakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांच्या अटकेनंतर वातावरण तापलं; मंत्र्यांचं आंदोलन, तर राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मंगळवारी ईडीने अटक केली. त्यानंतर पीएमएलए न्यायालयानं मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी (Nawab Malik ED Custody) सुनावली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज सरकारमधील मंत्री आणि नेते आंदोलन (Mahavikas Aghadi Agitation) करणार आहेत, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनाची हाक दिली आहे.

महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्त्यांचं आंदोलन

ईडीने मलिकांवर कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. याचवेळी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कायदेशीररित्या जनतेत जाऊन मुकाबला करू. आज मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही मंत्री निषेध म्हणून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा छगन भुजबळ यांनी दिला होता. तसेच उद्यापासून सर्व तालुका, जिल्हा, शहर पातळीवर शांतपणे मोर्चा, आंदोलन करणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलं.

भाजपकडून राजीनाम्याची मागणी -

नवाब मलिक यांना पोलिस कोठडी झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाईल का? असा प्रश्न होता. मात्र, मलिकांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं सरकारमधील तिन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. पण, आता भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. नवाब मलिकांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार साहेब नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन करू, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनाची हाक दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT