Ajit Pawar Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा मोठा खुलासा; म्हणाले, "अजित पवार स्वतःहून आले अन्..."

सकाळी ८ वाजता शपथविधी झाला तरी लोक त्याला पहाटेचा शपथविधी म्हणतात. याला काय अर्थ आहे?, असंही कोश्यारी म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना ठरली आहे. या घटनेबाबत अजूनही विविध खुलासे होत आहेत. नुकतंच राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या पहाटेच्या शपथविधीबद्दल खुलासा केला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतंच मुंबई तकला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये कोश्यारींनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, "दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचं पत्र दाखवलं. मग शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात आव्हान दिल्यावर त्यांनी माघार घेत राजीनामा दिला."

कोश्यारी पुढे म्हणाले, "राज्यपाल कधीही स्वतःहून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचं सत्य सांगितलं आहे."

हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

त्यावेळी तुमच्यावर कोणाचा दबाव होता का, असं विचारलं असता कोश्यारी म्हणाले, "माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांनी मला वेळ मागितला, मग मी त्यांना वेळ दिला. काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. ते म्हणाले की वेळ दिली तर आमदारांचा घोडेबाजार होईल. मग मी बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी कमी केला. यात माझी भूमिका संदिग्ध कशी काय? सकाळी ८ वाजता शपथविधी झाला तरी लोक त्याला पहाटेचा शपथविधी म्हणतात. याला काय अर्थ आहे?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Petrol Price Statement : 'पेट्रोल 130 रुपयांवर जाईल, देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती...'; आमदार जयंत पाटील यांचं मोठं विधान

तुम्हाला माझी जात माहितीये का? नाना पाटेकरांचं बेधडक वक्तव्य, नितीन गडकरींसमोर म्हणाले, 'माझ्या आईने मला...'

Paithan Copper Theft : आडूळ परिसरात विहिरीतील मोटारींच्या केबलमधील तांबा लंपास; दोन दिवसांत १५ शेतकऱ्यांची चोरी

Mumbai-Goa Highway Toll : कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण, पण 'या' ठिकाणी टोलनाका उभारणी अंतिम टप्प्यात!

CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

SCROLL FOR NEXT