NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde on same stage with the kerala story actress adah sharma rak94 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : शपथविधीनंतर CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवार पहिल्यांदाच एकत्र; 'केरळ स्टोरी' फेम 'अदा'ही असणार

रोहित कणसे

मुंबई : राज्याच्या राजकारणात काल एक मोठा राजकीय भुकंप झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे ८ अमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान अजित पवारांनी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

महिला व बालविकास विभागाच्या 'राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात येणार आहे. मंत्रालयात आज दुपारी २ वाजता महिला व बालविकास विभागाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रथमच एकत्र उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अदा शर्माची उपस्थिती

दरम्यान महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वादात सापडलेला चित्रपट'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा ही सुद्धा उपस्थित असणार आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग

दरम्यान अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यतील राजकीय वर्तुळात घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. काल शरद पवारांनी जाहीर केलं होतं की आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, त्यानुसार ते आज सकाळीच कराड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कराड येथे त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

तर इकडे अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. आगामी काळातील वाटचालीबद्दल अजित पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, तसेच त्यांच्याकडून सोबत असलेल्या आमदारांच्या आकड्याची घोषणा देखील होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT