NCp 
महाराष्ट्र बातम्या

पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या धनंजय मुंडे यांची काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेल्या अहमद पटेल यांना विशेष ओळख करून दिली. त्यामुळे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(सौजन्य - टीव्ही 9)

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काल (मंगळवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला दिल्लीतून मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाळ आणि अहमद पटेल हे प्रमुख काँग्रेस नेते आले होते. शरद पवार यांनी या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोण कोठे बसणार हे शरद पवार स्वतः सांगत होते. त्यावेळी आपल्या मागच्याच खुर्चीवर धनंजय मुंडे यांना बसण्यास सांगितले.

शरद पवार यांच्या शेजारी बसलेल्या अहमद पटेल यांना पवार यांनी सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमधून फक्त मुंडेंची ओळख करून दिली. पवारांनी धनंजय मुंडेंचा हात धरून विशेष ओळख करून दिली. त्यांना हे आमचे विरोधी पक्षनेते असे सांगितले. अहमद पटेल यांनीही पवार स्वतः ओळख करून देत असल्याने त्यांच्याशी हातमिळवणी केली. या घडामोडीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. पवार यांना नक्की कोणती संकेत द्यायचे आहेत, याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT