NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Political Crisis : ...म्हणून राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच; अजित पवार गटाचा दावा

महाराष्ट्रातील NCP राजकारणातील संकट: ...म्हणून राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच; अजित पवार गटाचा दावा

रोहित कणसे

राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला जातोय. यादरम्यान विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठवलेल्या नोटीसीला अजित पवार गटाकून विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर केलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ आमचाच आहे असा दावा करण्यात आला आहे.

दीड-ते दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना नोटीस जारी करण्यात आली होती. अजित पवार गटाने दिलेल्या उत्तरात आमचा गट हाच मूळ राष्ट्रवादी आहे, कारण पक्षाचे विधानसभेचे प्रतोद अनिल पाटील हे आमच्या बाजूने आहेत. तसेच आमदारांची संख्या देखील आमच्याकडे जास्त आहे.त्यामुळे मूळ राष्ट्रवादी ही आमची आहे. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत निर्णय घेतला जावा अशी भूमिका घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर नोटीसला उत्तर देताना ही भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान लवकरच विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? आणि आमदार अपत्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू होणार आहे, यापूर्वी अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT