Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : अजितदादा गटातून कोणी आपल्यात येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मागच्या बाकावर बसवा; शरद पवारांचे आदेश

साताऱ्यात कोणता गट स्ट्राँग होणार व सर्वसामान्य कार्यकर्ते कोणाच्या बाजूने जाणार?

सकाळ डिजिटल टीम

सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. यातील दोन आमदार हे अजित पवार गटात आहेत.

सातारा : राष्ट्रवादीच्या (NCP Crisis) दुफळीनंतर जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. काल खासदार शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत यापुढे शरद पवार गटाचे (Sharad Pawar) स्वतंत्र अस्तित्व राहणार आहे.

तसेच अजित पवार (Ajit Pawar) गटातील कोणी येण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना मागच्या बाकावर बसविण्याची सूचना खासदार पवार यांनी केली. यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येणार असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन उमेदवार पाहायला मिळणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर साहेब व दादा गट आतून एकच असल्याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होती. हा संभ्रम दूर करण्यासाठी खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक काल मुंबईत घेतली.

या बैठकीत खासदार शरद पवार यांनी जिल्हाध्यक्षांना काही कानमंत्र दिला, तसेच जिल्हाध्यक्षांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे स्वतंत्र अस्तित्व राहणार आहे. दोन्ही गटात आतून कोणतेही कनेक्शन नसल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले, तसेच यापुढे आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढल्या जातील.

त्यासाठी सर्व जिल्ह्यात तयारी करावी, तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली आहे. तसेच अजित पवार यांच्या गटातून कोणी श्री. पवार गटात आलेच, तर त्यांना मागच्या बाकावर बसवावे, अशी सक्त सूचना श्री. पवार यांनी केली आहे. या सर्व सूचना पाहता जिल्ह्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार पाहायला मिळणार आहेत.

जिल्ह्यात अजित पवार गटानेही स्वतंत्र कार्यालय, पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. जिल्ह्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची सर्व जबाबदारी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरच राहणार आहे. त्यांना खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य राहणार आहे.

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. यातील दोन आमदार हे अजित पवार गटात असून, कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे खासदार शरद पवार यांच्या गटात आहेत. त्यामुळे साताऱ्यात कोणता गट स्ट्राँग होणार व सर्वसामान्य कार्यकर्ते कोणाच्या बाजूने जाणार? त्यावर कोणता गट स्ट्राँग ते समजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT