Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… अजित पवारांचे पुण्यात बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

कोथरूडमध्ये लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, तरीही अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच त्यात आणखी एका भर घातली आहे.

अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघात म्हणजेच पुण्यातील कोथरूड परिसरात झळकले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Banner

अजित पवार यांनी काल 'सकाळ' माध्यम समूहाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे.

'महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार…' असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. कोथरूडमध्ये अचानक अजित पवार यांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी काल 'सकाळ' माध्यम समूहाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT