Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane : 'नितेश राणे हे भाजपचा नाच्या आहेत', राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची जहरी टीका

सकाळ डिजिटल टीम

पुणेः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची तुलना नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्याशी नितेश राणे यांनी केली. त्यानंतर राज्यभरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी राणेंवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. राऊत यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपचं सामान संजय राऊतांना पाठवून दे.

'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.' ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

रुपाली पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर

रुपाली पाटील म्हणाल्या की, गौतमी पाटील ही पोटासाठी काम करते. परंतु तिची तुलना संजय राऊत यांच्याशी का करायची? तिने मागे केलेल्या चुका आता सुधारल्या आहेत. परंतु हे लोक महिलांना हिणवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते भाजपचे नाचे आहेत का? तमाशामध्ये जसं मध्येच येऊन नाचे नाचतात, तसं ते आहेत का? असं रुपाली पाटील म्हणाल्या.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांनी समज द्यावी, त्यांच्या थोडीजरी सभ्यता शिल्लक असेल तर त्यांना ते सांगतील. राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता असतांना विकासकामांबद्दल बोललं जात नाहीये. केवळ आरोप-प्रत्यारोप करायचे. त्यामुळे मला वाटतं आमचे टिल्लूभाऊ भाजपचे नाच्या आहेत, अशी सणसणीत टीका रुपाली पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय? आज सायंकाळपर्यंत येणार डीजीसीएचा रिपोर्ट

Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

SCROLL FOR NEXT