NCP MLA Sanjay Khodke Accident

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

NCP MLA Sanjay Khodke Accident रूग्णालयात उपचार सुरू ; अपघातात संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाली आहे.

Mayur Ratnaparkhe

NCP MLA Accident In Amravati : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज(शनिवार) दुपारी तीनच्या दरम्यान अमरावतीमधील डॉ. पंजाबराव कॉलनी परिसरात हा अपघात झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. नवसारी परिसरातील एक बैठक आटोपून संजय खोडके हे आपल्या दुचाकीने दुसऱ्या बैठकीला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाली. त्यांना येथील राजापेठ परिसरातील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले.

संजय खोडके हे शहरात नेहमीच दुचाकीने प्रवास करतात. लोकांशी संपर्क साधणे सोयीचे व्हावे, यासाठी चारचाकी वाहनाऐवजी स्वत: दुचाकी चालवून कार्यक्रमस्थळी पोहोचणे पसंत करतात. पण, आज नवसारी परिसरात त्यांना अपघाताला सामोरे जावे लागले. अचानकपणे एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तसेच कार्यकर्त्यांनी लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान त्यांनी समाजमाध्यमातून स्नेहीजन व कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, आपण स्वस्थ असून उद्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मी सुखरूप आहे, काळजी करण्याचे कारण नाही -

आज मी दुपारी तीन वाजता माझ्या दुचाकीने जात असताना अपघात झाला. सध्या माझ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्टसुद्धा सामान्य आहेत. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. या काळात माझ्यासोबत असलेल्या माझ्या सर्व स्नेहीजणांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असं आमदार संजय खोडके म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT