supriya sule  
महाराष्ट्र बातम्या

LGBTQ वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचा मुनगंटीवारांना टोला: 'आपण...'

LGBTQ समुहाबद्दल व्यक्त केलेल्या मतावरुन सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

LGBTQ Statement : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी LGBTQ समुहाबद्दल व्यक्त केलेल्या मतावरुन सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्यावर अनेकांनी त्या विधानावरुन टीका केली आहे. विधींमंडळात ज्या विधेयकावर चर्चा झाली त्यामध्ये LGBTQ समुहाच्या व्यक्तींना सहभागी करुन घेण्यावरुन मुनगंटीवार यांनी तीव्रपणे आपली भूमिका मांडली. मात्र त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी झोडपले आहे. याशिवाय बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार हे अज्ञानी आणि अशिक्षित असल्याची प्रतिक्रिया या सेलिब्रेटींनी दिली होती. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि रिचा चढ्ढा (Richa Chaddha) यांचा समावेश होता.

आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील मुनगंटीवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी मुनगंटीवार यांच्या त्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. सुळे यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. त्यात त्या म्हणतात, प्रत्येकाची अशी एक खास ओळख आहे. ज्याला त्याला आपल्या स्वताच्या ओळख ठरवण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणीही का असेना मात्र प्रत्येकाला समान पद्धतीनं वागणूक मिळायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. असं वाटतं. समलिंगी यांच्याबद्दल विधीमंडळात जे विधान करण्यात आले ते गंभीर आहे. आपल्याला मतदारांनी ज्या भूमिकेतून निवडून दिले आहे त्याचा विचार करुन समाजातील सर्वच घटकांना एकत्रित ठेवण्याचा विचारही केला गेला पाहिजे. असंही सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

विद्यापीठ सुधारणा विधेयकानुसार LGBTQ सुमहाच्या (LGBTQ Community) प्रतिनिधींना सदस्यत्व देण्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar)यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी LGBTQ समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विविध स्तरावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. बॉलीवूडमधून देखील मुनगंटीवारांवर टीका करण्यात आली. ''ज्या गोष्टी कधी सिद्ध करता येणार नाही, अशा गोष्टींचा या विधेयकामध्ये समावेश आहे. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का?'' असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला होता. तसेच अलैंगिक संबंधाची परिभाषा सरकारने सांगितली नाही. तर तुम्ही जनावरासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना अलैंगिक व्यक्ती समजणार का? असं वादग्रस्त वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT