NCP
NCP 
महाराष्ट्र

...यासाठी सोडताहेत राष्ट्रवादीचे नेते पक्ष; 10 आमदार करणार रामराम

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे. 

पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला. त्यामुळे त्या पक्ष सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले.

यातील काही आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती, तर काही जण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप व २०१४ ला बबनराव पाचपुते यांचा पराभव केलेले श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माढ्‌याचे बबन शिंदेदेखील पक्षांतर करणार असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. उस्मानाबादचे नेते राणाजगजितसिंह पाटील देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तर सातारातून शिवेंद्रराजे भोसले देखील पक्ष सोडणार आहेत. 

राष्ट्रवादीच्या या विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाचे नेते हवालदिल झाले आहेत.

.. यासाठी सोडताहेत पक्ष ..
दिलीप सोपल : स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव
बबन शिंदे : साखर कारखानदारीला अभय मिळावे म्हणून
संग्राम जगताप : पोलिस चौकशीचा ससेमिरा, विजयाची खात्री नाही
अवधुत तटकरे : चुलते सुनील तटकरे यांच्याशी राजकीय स्पर्धा 
राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजसाठी
वैभव पिचड : सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन 
संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही
संदीप नाईक : स्थानिक मतदारसंघात युतीचा वाढता प्रभाव

पक्षाला गळती
    नगरचे तीनही आमदार भाजपात 
    महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही रामराम 
    महिनाअखेर पक्षप्रवेश होणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT