Ncp Sharad Pawar give creadit to chhagan bhujbal ncp mva govt for OBC reservation local body elections
Ncp Sharad Pawar give creadit to chhagan bhujbal ncp mva govt for OBC reservation local body elections  sakal
महाराष्ट्र

भुजबळ, राष्ट्रवादीसह मविआच्या नेतृत्वामुळं ओबीसी आरक्षण मिळालं - शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिल्यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच पुढील दोन आठवड्यात बांठिया अहवालानुसार राज्यात निवडणुका घोषित करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत, दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (NCP Sharad Pawar give creadit to chhagan bhujbal ncp mva govt for OBC reservation local body elections)

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणानाची लढई जिंकल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत, "सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो." असे म्हटले आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आगामी निवडणूकांत ओबीसी समाजातील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे, ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच मविआ सरकारच्या प्रयत्नांची आठवण करून देतपवारांनी ट्वीट केलं की "ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली याचे समाधान वाटते. हे आरक्षण टिकावे यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज त्याची परिणती या निर्णयात दिसली, असेही त्यांनी म्हटले आहे."

शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या आहवालाची आठवण सांगत आम्ही ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद केले, त्यांनी .म्हटले आहे की, "मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असून त्यांच्या उन्नतीप्रतिची बांधिलकी कायमच राहील, याचा पुनरुच्चार या निमित्ताने करतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT