राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सगळीकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत माझे सुप्रिया ताईंसोबत चांगले संबंध आहेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते, यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी पुन्हा त्यांच्यावर टीका करत स्वत:च्या चुकीच्या वक्तव्याच समर्थन करू नका, माफी मागा, असे सुनावले आहे. (ncp vidya chavan demand apology from bjp chandrakant patil over statement on supriya sule)
विद्या चव्हाण यांनी ट्वीट केलं आहे, त्या म्हणाल्या आहेत की, "कोणतीही आई...! किती ही रागात असली तरी, पोटच्या पोराला "मसणात जा" असे म्हणत नाही..! स्वतःच्या चुकीच्या वक्तव्याच समर्थन करू नका..! माफी मागा..! भाजपाच्या पदाधिकार्यांपासून भाजपाच्या अध्यक्षांपर्यंत महिलांना घरी बसून 'चूल' आणि 'मूल' सांभाळा ह्या अहंकारी पुरुषी मनुवृत्तीचा महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील प्रत्येक महिला, भाजपच्या सुसंस्कृत पणाचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही..!", असे त्या म्हणाल्या आहेत.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना, कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. त्यांच्या वक्तव्याने महिलेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे.
या आधी देखील विद्या चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात चव्हाण यांनी ट्विट करत टोला लगावला होता. त्या म्हणाल्या होत्या की, बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते. चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या, असं म्हणत त्यांनी टोमणा लगावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.