Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP vs MNS: मनसेच बोचर ट्विट; जितेंद्र आव्हाड हे तर अफझलखानचे...

'हर हर महादेव' या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद

सकाळ डिजिटल टीम

'हर हर महादेव' या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद पेटल्याचे दिसून येत आहे. काल ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री 10 वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्यानंतर या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चित्रपट बंद करत प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन करण्यात आलं. पण आवाहन केल्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने हुसकावून बाहेर काढले यामुळे वाद झाले. यामध्ये एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. त्यानंतर काही वेळातच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा राष्ट्रवादीने बंद केलेला शो पुन्हा सुरु केला. दरम्यान मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटरवरुन या प्रकारावरुन संताप व्यक्त केला आहे.

अमेय खोपकर यांनी, ट्विट करत “अफझलखानचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान…” अशा तिखट शब्दात आव्हाड यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत,” असंही अमेय खोपकर म्हणालेत.

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे मोठे विधान केले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT