Ajit Pawar_Rajendra Pawar_Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Rajendra Pawar on Sharad Pawar: ...तर राष्ट्रवादी तेव्हाच फुटली असती! शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवारांचं मोठं विधान

अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी पूर्वीचा एक किस्सा सांगताना पक्षात तेव्हाच फूट पडली असती असं म्हटलं आहे. तसेच बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. (ncp would have split that time sharad pawar nephew rajendra pawar big statement)

माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, "शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अजित पवार राजकीय क्षेत्रात आले. त्यानंतर राजकारणात त्यांनी सक्रीयपणे भाग घ्यायला सुरुवात केली. याकाळात मी दोन वेळा छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याला रस असल्याचं म्हटलं होतं. पण शरद पवारांनी दोन्ही वेळेला मला या क्षेत्रात न येण्याचा आदेश दिला. हा आदेश दोन्ही वेळेला मी पाळला. (Latest Marathi News)

पण मला वाटतं की हा जरी राजकीय निर्णय असला तरी शरद पवारांना राजकारण जास्त कळतं. त्या काळात मी जर राजकीय क्षेत्रात आलो असतो तर याची सुरुवात त्याचवेळी झाली असती. पण जे काही झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे. (Marathi Tajya Batmya)

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार आमनेसामने येणार आहेत, यावर भाष्य करताना राजेंद्र पवार म्हणाले की, "हे खरंतर असं व्हायला नको होतं. कारण हे आमच्या कुटुंबासाठी वेदनादायी आहे. बारामतीतील लोक ५० वर्षांपासून आमच्यासोबत आहेत. पण त्यांच्यावर जर कोणी दबाव टाकला तर त्यांच्यावर मानसिक दडपण येईल ते खूप मोठं असेल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates Live: चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटले नाही जाणूनबुजून म्हंटले आहे : नरेश म्हस्के

Numerology 2025 : 'या' मूलांकाच्या मुली असतात अतिशय स्वतंत्र आणि प्रॅक्टिकल ! करिअरमध्ये आघाडीवर पण लग्नाला होतो उशीर

Video : तरुणाने गाठला निर्दयतेचा कळस ! जिवंत अजगर बाईकला बांधले, ५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अन्...व्हिडिओ व्हायरल

White Eyebrow and Beard Hair: भुवई व दाढीचे केस पांढरे होतायत? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताची वाढलीय डोकेदुखी!

SCROLL FOR NEXT