Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: दिल्लीमध्ये PM मोदी, अजित पवार आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा; एकनाथ शिंदे...

दिल्लीत काल अजित पवार, पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी, नड्डा यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक बैठका, चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बैठका पार पडल्या. विरोधकांची बैठक बेंगळुरू येथा पार पडली तर सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक दिल्लीत येथे पार पडली. (Latest Marathi News)

भाजपच्या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काल दिल्लीला गेले होते. पण या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम दिसुन आला. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. परंतु त्यांच्यासोबत अजित पवार बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळाच्या दिशेला निघाले तेव्हा अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे.(Latest Marathi News)

या नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

NDAच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा बैठक झाल्याची माहीती आहे. अजित पवार, अमित शाह, जे पी नड्डा, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे. तर या बैठकीतील चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे. बैठक संपल्यानंतर सर्व नेते बाहेर पडले, त्यानंतर या 4 नेत्यांत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

तर NDA ची बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदी जाण्यासाठी निघाले तेंव्हा त्यांना गाडीपर्यंत सोडवायला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल गेले होते.

भाजपकडून काल नवी दिल्लीत NDAची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT