udaynraje bhosale
udaynraje bhosale 
महाराष्ट्र

कुणाची बोलण्याची लायकीच नाही : उदयनराजे भोसले

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्लीः शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही, असे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगत भिडे यांच्याविषयी आदर व्यक्त केला.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे म्हणाले, 'कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बोलताना संभाजी भिडे गुरुजी रडले. संभाजी भिडे गुरुजींविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही.

त्यांचे काम मला चांगले माहित आहे. त्यांच्याबद्दल आदर असून, ते मॅथेमॅटिक्स विषयात एक नंबर आहेत. आपण त्यांच्या पाठिशी आहोत.'

हिंदू एकता आघाडीचे मिलींद एकबोटे माझा मित्र आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा मित्र असून, त्यांनी काही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. हिंसाचारामुळे दोन हजार कोटींचं नुकसान झाले, अशी उद्रेक करणारी

वक्तव्यं करु नयेत. वैयक्तिक स्वार्थासाठी असे प्रकार करणे चुकीचे आहे. जातीच्या आधारावर देशाचे तुकडे होण्याआधी माझे डोळे मिटलेले बरे, असेही उदयनराजे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT