new helpline number of police and other service one number in sangli 
महाराष्ट्र बातम्या

पोलिस, रुग्णवाहिका यांसह सर्व सेवांच्या हेल्पलाईन एकाच नंबरवर; राज्यभरात होणार लागू

शैलेश पेटकर

सांगली : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जीपीएस प्रणालीवर आधारित ही सेवा असेल. नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर पूर्वीचा ‘१००’ हा क्रमांक बंद  करण्यात येणार आहे. नव्या क्रमांकामुळे त्वरित मदत उपलब्ध होईल तसेच पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी होईल.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही पोलिसांशी संपर्क साधण्याचा ‘१००’ हा क्रमांक आता बदलला जाणार असून, ‘११२’ या एकाच हेल्पलाईनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अगदी काही महिन्यांतच हा  हेल्पलाईन नंबर कार्यान्वित होणार आहे. यासाठी सविस्तर प्रशिक्षण संबंधितांना दिले गेले आहे.

सध्या राज्यात पोलिसांसाठी संपर्क करायचा झाल्यास १००, अग्निशमन दल १०१, रुग्णवाहिकेसाठी १०८ आणि महिला हेल्पलाईन १०९० या क्रमांकांवर संपर्क साधावा लागतो. या सर्व हेल्पलाईनचे एकत्रीकरण केले जात आहे. जीपीएसच्या यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळेस या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्‍यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होणार आहेत.

अशी असेल सेवा 

आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणालीअंतर्गत राज्यातील सर्व भागांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. ‘११२’ क्रमांकावरून मदत मागितल्यास दूरध्वनी कॉल सेंटरला पोहोचेल. त्यानंतर घटनास्थळानजीक गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या जीपीएस यंत्रणेवर त्याची माहिती जाईल. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत मिळेल. नवीन यंत्रणेद्वारे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणारी व्यक्ती कोठून बोलत आहे (लोकेशन), याबाबतची माहिती त्वरित उपलब्ध होईल. पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती काही मिनिटांत उपलब्ध होईल. 

अत्याधुनिक गाड्या दाखल होणार 

नव्या यंत्रणेसाठी जिल्ह्यात नव्या ३५ वाहनांसाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. ही वाहने संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गस्तीवर असतील. ‘११२’ क्रमांकावरून मदत मागितल्यास तत्काळ त्या वाहनावरून अंमलदारांना माहिती दिली जाईल. या माध्यमातून काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल होतील. 

"आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. या माध्यमातून काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी धावतील. यामुळे गुन्हेगारी रोखण्यावरही या नव्या यंत्रणेचा फायदा होईल. अत्याधुनिक यंत्रणा असून सारी आपत्कालीन परिस्थितीतील मदत एकाच क्रमांकावरून मिळणार आहे."

- दीक्षित गेडाम, पोलिस अधीक्षक, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT