Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Amruta Fadnavis, Anil Jaysinghani
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Amruta Fadnavis, Anil Jaysinghani 
महाराष्ट्र

अमृता फडणवीस ब्लॅकमेलींग प्रकरणात नवा ट्विस्ट! बुकी अनिल जयसिंघानीचे उद्धव ठाकरेंसोबत कनेक्शन?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हा वाद आता पेटला उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

अनिक्षा जयसिंघानी ही देशातील सर्वात मोठा बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी असल्याचं समोर आलं होतं. तसेच तिची देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी पाच वर्षे मैत्री होती. यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडून प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन कऱण्याची मागणी केली होती.

चतुर्वेदी यांनी मागणी केली असतानाच आता बुकी अनिल सिंघानीसोबतचा उद्धव ठाकरे यांचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये सिंघानी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं दिसून येत आहे. हा फोटो २०१४ मधील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.

दुसरीकडे अनिक्षा हिच्या पोलिस कोठडीत वाढ कऱण्यात आली आहे. हे सगळ प्रकरण एका व्हिडीओच्या आधारे केलेल्या ब्लॅकमेलिंगवर आधारित असल्याचं समजतं. त्यामुळे अनिक्षा हिच्या चौकशीनंतरच व्हिडीओचा खुलासा होणार आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि बुकी अनिल सिंघानी यांचा फोटो समोर आल्यानंतर आता प्रियंका चतुर्वेदी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

याआधी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात अनेक बडे नेते असल्याचं म्हटलं होतं. त्यातच उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांचा फोटो समोर आला आहे. मात्र याला अद्याप ठाकरे गटाकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT