Nihar Thackeray has announced his support to CM Eknath Shinde maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचादेखील CM शिंदेंना पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यानंतर आता ठाकरे कुटुंबातून देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी स्मिता ठाकरे यांनी शिंदेची भेट घेतली होती यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी काळात ते नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

निहार ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुतणे आहेत, तसेच त्यांच्या ठाकरे कुटुंबाशी असलेल्या संबंधामुळे आता राजकीय समिकरणे बदलणार आहेत. निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलेल्या पाठिंबा जाहीर करणं हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. निहार ठाकरे यांची याआधी ते कुठेही चर्चेत नव्हते तसेच त्यांना कुठल्याही राजकीय चळवळीत भाग देखील घेतलेला नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना समोर येत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. निहार ठाकरे हे बिंदू माधव यांचे पुत्र आहेत तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे ते जावई आहेत.

दरम्यान निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, सोबत शिंदे गटाच्या भारतीय कामगार सेनेचे पदाधीकारी किरण पावसकर यांच्या उपस्थितीत निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधकांकडून राज्याती शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या सर्वामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही नेत्यामध्ये विस्ताराच्या फॉर्मूल्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ललकरच होऊ शकतो या चर्चांना पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही नेत्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये 60-40 असा फॉर्मुला ठरल्याचे कळतंय. एवढेच नव्हे तर 31 जुलैनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT