Aashadhi Pandharpur Wari  eSakal
महाराष्ट्र बातम्या

वारकऱ्यांसोबत पोलिसांची निर्भया पथके! वारीमुळे ‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी १० दिवस राहणार बंद

पंढरीच्या पांडुरंगाची १० जुलैला आषाढी वारी आहे. त्यासाठी तब्बल १८ ते २० लाख वारकरी येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. ४-५ जुलैला संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांची पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन करणार आहे. त्यावेळी प्रत्येक पालखीसोबत महिला पोलिसांचे निर्भया पथक असेल.

तात्या लांडगे

सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाची १० जुलैला आषाढी वारी आहे. त्यासाठी तब्बल १८ ते २० लाख वारकरी येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. ४-५ जुलैला संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांची पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन करणार आहे. त्यावेळी प्रत्येक पालखीसोबत महिला पोलिसांचे निर्भया पथक असेल. प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी पोलिस मदत केंद्र असेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

संत ज्ञानेश्वरांची पालखी ४ जुलैला सोलापूर जिल्ह्यात आगमन केल्यानंतर पहिला मुक्काम नातेपुते येथे असेल. ५ जुलैला माळशिरस, ६ जुलैला वेळापूर, ७ जुलैला भंडीशेगाव, ८ जुलैला वाखरी आणि ९ जुलैला पंढरपूर येथे पालखी मुक्कामी असणार आहे. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम (५ जुलै) येथे असेल. त्यानंतर बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी आणि पंढरपूर असा पालखीचा मुक्काम राहील. पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबेल, त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व शौचालयांची सोय केली जाणार आहे. त्याच ठिकाणी वारकऱ्यांच्या मदतीसाठी पोलिस केंद्र असणार आहेत. वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, स्टॉलधारकही त्याच बाजूला असतील, असेही ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वारकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी ११२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून मदत मागावी, असे आवाहनही पोलिस अधीक्षक सातपुते यांनी केले आहे.

  • फलटण, पुणे, सोलापूर-पंढरपूर मार्ग

  • दहा दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद

आषाढी वारीच्या निमित्ताने मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतील. त्याअनुषंगाने १ जुलैच्या रात्री ११ पासून १० जुलैच्या रात्री आठपर्यंत वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे. फलटण- नातेपुते- माळशिरस- वेळापूरमार्गे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. त्या वाहनांसाठी पुणे- बारामती- इंदापूर- टेंभुर्णी- पंढरपूर हा मार्ग उपलब्ध असेल. तसेच पंढरपूर- वेळापूर- माळशिरस- नातेपुते- फलटण- पुणे हा मार्ग बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहनांसाठी पंढरपूर-टेंभुर्णी- पुणे हा मार्ग उपलब्ध असेल. इंदापूर- अकलूज आणि सोलापूर- पंढरपूर हे मार्गही बंद राहणार आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदाची आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. १८ लाखांपर्यंत भाविक पंढरीत दाखल होतील, असा अंदाज आहे. प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत. वारकऱ्यांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलिस असतील.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत लढाऊ विमानांची हवेत भीषण धडक; एअर शो दरम्यान दुर्घटनेनंतर आगीचा भडका

Solapur Youth Congress: इंधन दरवाढ, ‘नीट’प्रकरणी आंदोलन; सोलापूर शहर युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयावर धडक मोर्चा..

Nagpur Firing : राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालय परिसराजवळ मध्यरात्री गोळीबार, सहा जण बाईकवर आले अन्...

Sindhudurg Tourism: सिंधुदुर्ग सागरी पर्यटनासाठी ऐतिहासिक पाऊल!समुद्रात उतरणार पर्यटनाचा ‘गुलदार’; निवती येथे साकारणार पाण्याखालील संग्रहालय..

Lal Khurma: कुशीनगरचा 'लाल खुरमा' बनणार ग्लोबल ब्रँड! 'ODOC'मध्ये युपीच्या या पारंपरिक मिठाईची हवा; जाणून घ्या काय आहे खास!

SCROLL FOR NEXT