Narayan Rane-Nitesh Rane in Disha Salian death Case esakal
महाराष्ट्र बातम्या

राणे पिता पुत्रांची रात्र पोलीस ठाण्यातच? कार्यकर्ते संतप्त, पोलिसांचा लाठीचार्ज

दिशा सालियानच्या आई वडीलांनी केलेल्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

सुधीर काकडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर तब्बल ८ तास चौकशीसाठी थांबवण्यात आलं आहे. त्यानंतर आता मालवणी पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरु केला आहे. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. राणे पिता-पुत्र आज दुपारी पावणेदोनच्या दरम्यान समर्थकांसह मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाले. मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना दिशा सालियान (Disha Salian) प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. दरम्यान, मालवणी पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर हत्याचा झाल्याचा आरोप करताना आक्षेपार्ह आरोप राणेंनी केले होते. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महिला आयोगानं पोलिसांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT