Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंच्या छातीत वेदना; रुग्णवाहिका थांबवून केले उपचार!

यापूर्वी देखील राणे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारांसाठी सिंधुदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अधिक तपासासाठी कोल्हापूरला नेण्यात येत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच थांबवून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, राणे यांची कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (CPR) उपचार करण्यात येणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. (Nitesh Rane chest pain again treatment done by stopping ambulance on road)

पोलिसांनी नितेश यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केल्यामुळे न्यायालयानं १८ फेब्रुवारीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं समोर आल्यानं त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, नितेश राणे यांची (ता. ५) शनिवारी कोल्हापुरात छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) मध्ये वैद्यकीय तपासणी होणार होती. पण त्यांना सिंधुदुर्ग रुग्णालयातच उपचार करण्यात आले. त्यानंतर आज (सोमवार) त्यांना रुग्णालयातून कोल्हापुरात नेत असताना पुन्हा छातीत दुखू लागलं. यावेळी त्यांचा ताफा रस्त्यातच थांबवून डॉक्टरांनी उपचार केले त्यानंतर हा ताफा पुढे कोल्हापूरला रवाना झाला. यानंतर त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार होणार आहेत.

नितेश राणे आहेत या आजारांनी ग्रस्त

नितेश राणे यांना किडनी स्टोन, ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यातच त्यांची शुगर कमी झाल्यानं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करून सुद्धा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळं शासकीय रुग्णालय असलेल्या कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिथे चेकअप केल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा गांवकर यांनी दिली.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी राणे २ फेब्रुवारी रोजी कणकवली न्यायालयात शरण आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल कोठडी संपल्यानंतर पुन्हा कणकवली न्यायालयात हजर केले असता राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

SCROLL FOR NEXT