Nitesh Rane  सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

'हा' तर पांडे यांचा मास्टर प्लॅन; नितेश राणे यांचा आरोप

मुंबई बँकेत प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांनी २००० कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आपने केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोगस मजूर असल्याचे व मुंबई बँक आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत हा पांडे यांचा मास्टर प्लॅन असल्याचा आरोप केलाय.

नितेश राणे ट्वीट करत म्हणाले, “अपेक्षेप्रमाणे.. पुढचे लक्ष्य प्रवीण दरेकरजी!पांडे त्याच्या मास्टर प्लॅननुसार खेळत आहे, याचा अंदाज आम्हाला आधीपासून आला होता. नावानावाने ते त्यांच्या गुरूंची इच्छा पूर्ण करत आहे! आम्ही प्रवीण दरेकर यांच्यासोबत उभे आहोत. आम्ही सर्व एक आहोत.”

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांनी २००० कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आपने केला आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करत काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला असून तो अहवाल आपण देण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान, सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याप्रकरणी सतत पाठपुरावा केल्यानंतर आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असल्याचं आम आदमी पक्षाने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT