Nitesh Rane case esakal
महाराष्ट्र बातम्या

संतोष परब प्रकरण: नितेश राणेंची कोल्हापुरात होणार वैद्यकीय तपासणी?

राणेंना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी नितेश यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केल्यामुळे न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आल्याने त्यांना सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नितेश राणे यांची आज (ता. ५) शनिवारी दुपारी कोल्हापुरात (Kolhapur) छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) मध्ये वैद्यकीय तपासणी होणार आहे. चार वाजता पोलिस बंदोबस्तात राणे यांना कोल्हापुरात आणणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नितेश राणे यांना स्टोनचा त्रास आहे. तसेच ब्लड प्रेशर आहे. त्यातच त्यांची शुगर काल कमी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार करून सुद्धा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालय असलेल्या कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिथे चेकअप केल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती भाजपच्या शिष्टमंडळाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अपर्णा गांवकर यांनी दिली.

भाजपचे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, डॉ अमोल तेली, संदीप साटम, शिशिर परुळेकर, रवी शेट्ये यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अपर्णा गांवकर यांची भेट घेऊन नितेश राणे यांच्या प्रकृतीच्या स्थितीबाबत माहिती घेतली. राणे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने काल त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी राणे २ फेब्रुवारी रोजी कणकवली न्यायालयात शरण आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल कोठडी संपल्यानंतर पुन्हा कणकवली न्यायालयात हजर केले असता राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी न्यायालयात शरण येण्यापूर्वी पासून राणे यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे न्यायालयीन कोठडी झाल्यावर राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी न्यायालय व आरोग्य यंत्रणेकडे याबाबत माहिती देत त्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे राणेंना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. येथे तपासणी केली असता त्यांची तब्बेत ठीक नसल्याचे तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. कोठडीत ठेवले नव्हते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने त्यांना कोल्हापूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT