Political News esakal
महाराष्ट्र बातम्या

'बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत CM ठाकरे राजीनामा देणार का?'

ठाकरेंच्या घरापर्यंत ईडी: राणेंना आठवला मनोहर जोशींचा इतिहास, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण चागलचं ढवळलं आहे. राज्यात कारवाईचा सपाटा सुरू असताना ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आता ईडीच्या (ED) रडारवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आता भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

यात ते म्हणतात, इतिहास सांगतो की, मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हाच नियम इथे लागू होतो, की शिवसैनिकांचे नियम वेगळे आहेत? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे व व्यावसायिक श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना जोरदार धक्का देत ईडीने (ED) त्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली. यावरून बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तर पाटणकरांवरील कारवाई सूडबुद्धीने झाली असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi Govt.) नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध शिवसेना असा वाद उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT