Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

अँजिओग्राफी करुन मला मारुन टाकण्याचा कट होता; नितेश राणेंचा गंभीर आरोप

न्यायालयीन कोठडीदरम्यान, नितेश राणेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सुधीर काकडे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचा संघर्ष सुरु आहे. त्यातच राणे परिवार आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष संपण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांच्या न्यायालयीन कोठडी दरम्यान, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. त्यावेळी आपल्याला मारून टाकण्याचा कट रचला गेला होता असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान मला एका प्रकरणात अडकवण्यात आलं. यावेळी आपल्याला पोलीस आणि प्रशासनाचा जो अनुभव आला तो थक्क करणारा होता असं नितेश राणेंनी विधानभवनात सांगितलं. "आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी अंजिओग्राफी करण्यासाठी आग्रह केला. माझा रक्तदाब कमी झालेला होता, मला ते जाणवत होतं, मात्र तरीही डॉक्टर ऐकण्यास तयार नव्हते. मात्र काही आमच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की, अँजिओग्राफीच्या निमित्ताने तुमच्या शरिरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही अँजिओग्राफी करू नका." असे गंभीर आरोप नितेश राणेंनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचं हॉटेलमध्ये खाणं पिणं महागणार, खाद्यपदार्थांच्या दरात १०-१५ टक्क्यांची वाढ, कधीपासून होणार लागू?

दिवाळीपूर्वी स्विगीचा धमाका, लॉन्च केलं भन्नाट फीचर! आता एकाच ऑर्डरमध्ये मागवता येणार ५ रेस्टॉरंटमधून जेवण

Netflix मध्ये १,००० कर्मचाऱ्यांची कपात; २०२२ नंतरचा सर्वात मोठा निर्णय, 'या' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

Marathi News Live Updates: ज्ञानेश कुमार यांच्या निवड प्रक्रियेवर प्रकाश राज यांचे गंभीर सवाल

Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT