Nitesh Rane Supriya Sule Sakal
महाराष्ट्र बातम्या

"ताईंनी सल्ला देण्यापेक्षा घरात कोण किती भ्रष्टाचार करतंय याचं स्पष्टीकरण द्यावं"

दत्ता लवांडे

मुंबई : आम्ही ज्या पद्धतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सेवा करतो, त्या पद्धतीने कोणताच पक्ष गणेशभक्तांची सेवा करत असेल असं मला वाटत नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदूंच्या सणावर बंधने आले असा गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर रोहित पवारांवरील ईडी कारवाईसंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आहे.

(Nitesh Rane Latest News Updates)

"सुप्रिया ताईंनी सगळ्या बाबतीत सल्लामसलत करण्यापेक्षा आपल्या घरात कोण किती भ्रष्टाचार करतंय यासंदर्भात कधीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, कारण ईडी लहान मुलांची नर्सरी नाही, कुणाला नाही आवडलं तरी चॉकलेट हातात द्यायची. त्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यामुळे ते नोटिसा पाठवत असतात. त्यामुळे रोहित पवारांनी बायडेन, रशिया, युक्रेनबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या बुडाखाली किती आग लागली ते पहावं." अशा शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी आज औरंगाबाद येथे बोलताना शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाले असून त्यांचे आम्हाला फोन येतात आणि माफी मागतात. तब्बल १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असून आम्ही त्यांना शिवसेनेकडे येण्यासाठी ऑफर दिली." असं खैरे म्हणाले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधत तुमच्याकडे राहिलेले १०-१५ आमदार शिवसेनेत राहतात का हे तुम्ही पहा." असा टोला राणे यांनी लावला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याचा सल्ला दिला असून "त्यांनी आपल्या स्वपक्षाकडे पहावं, आम्हाला सल्ले देऊ नये.'' असा पलटवार आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: ३१ तासांच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचा समारोप, ढोल-ताशांच्या गजरात पुणेकर मंत्रमुग्ध

Ganpati Visarjan 2025 Live Updates : विट्याच्या राजा गणेशमूर्तीला भक्तीभावाने निरोप

Latest Maharashtra News Live Updates: तामिळनाडूत मुसळधार पाऊस! विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली, नागरिकांचे हाल

Valley of Flowers Maharashtra: महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहायचंय? मग भेट द्या साताऱ्याजवळील या निसर्गरम्य ठिकाणी!

Chapati Reheating : चपाती पुन्हा गरम करून खावू नये..पण का? डॉक्टर काय सांगतात पाहा..

SCROLL FOR NEXT