nitesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

महापालिका शाळेत भगवद्गीता नाही तर मग काय... - नितेश राणे

हिंदुराष्ट्र असणाऱ्या देशात भगवत गीतेच्या पठणाला विरोध होणं हे अत्यंत दुर्देवी आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदुराष्ट्र असणाऱ्या देशात भगवत गीतेच्या पठणाला विरोध होणं हे अत्यंत दुर्देवी आहे.

सध्या मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण बदलले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बऱ्याचवेळा अनेक आरोप पहायला मिळत आहे. दरम्यान, आता भाजपाचे नितेश राणे यांनी एक ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठणाच्या प्रस्तावावरून त्यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणतात, मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) योगिता कोळी यांनी महापालिका शाळांमध्ये भगवद्गीतेचं पठण व्हाव असा प्रस्ताव महापौरांचा समोर मांडला आहे. या प्रस्तावाला समाजवादी पक्षाने विरोध केला आहे. हिंदुराष्ट्र असणाऱ्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला विरोध होणं हे अत्यंत दुर्देव आहे. जर आपल्या शाळांत भगवद्गीतेचं (Bhagavad Gita) पठण करायचं नाही तर मग काय फतवा-ए-आलमगिरीचं पठण झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून राणे म्हणाले, हिंदुहृहय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की, भगवद्गीतेच्या पठणासंदर्भात जो प्रस्ताव महापालिकेमध्ये मांडला आहे तो मान्य करण्याचे आदेश द्यावेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT