Sharad Pawar and Raosaheb Danve Dinner Diplomacy e sakal
महाराष्ट्र बातम्या

दिल्लीत रंगलं स्नेहभोजन! पवारांच्या घरी गडकरी, तर दानवेंच्या कार्यक्रमात रोहित पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीने शिवसेना खासदार संजय राऊतांवर (ED Action on Sanjay Raut) कारवाई केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी भाजपवर आऱोप केले आहेत. या सर्व घडामोडीदरम्यान दिल्लीत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. पवारांच्या (Sharad Pawar) घरी आयोजित कार्यक्रमात संजय राऊतांसह भाजपचे नितीन गडकरींनीही (Nitin Gadkari Meet Sharad Pawar) उपस्थित दर्शविली होती, तर दुसरीकडे भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या रोहित पवारांची (Rohit Pawar) उपस्थिती दिसली.

सध्या राज्यातील आमदार एका प्रशिक्षणासाठी दिल्लीत आहेत. त्यानिमित्त शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसह भाजप आमदारांनाही निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आमदार आणि काही खासदार देखील उपस्थित होते. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आवर्जून उपस्थित दर्शवली होती. तसेच संजय राऊत देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार, नितीन गडकरी आणि संजय राऊत एकाच रांगेत बसलेले दिसून आले.

पवारांच्या कार्यक्रमात कोण होतं उपस्थित? -

खासदार सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर हे खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नीलम गोऱ्हे, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोहित पवार, आदिती तटकरे, सुनील शेळके, झिशान सिद्धीकी, अनिकेत तटकरे, डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह भाजप आमदारांनी देखील उपस्थिती दर्शवली होती.

रावसाहेब दानवेंकडून कार्यक्रम आयोजित -

रावसाहेब दानवे यांनी देखील एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची उपस्थिती दिसून आली. रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि भाजपकडून आयोजित दोन्ही कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी कुठल्यातरी गहन विषयावर चर्चा होत असल्याचे दिसून आले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड देखील यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT