युवा सेना मोहसीन शेख  
महाराष्ट्र बातम्या

राणेंच्या बंगल्याबाहेर लाठ्या खाणाऱ्या मोहसिन शेखला बनवलं युवासेना सचिव

या लाठीचार्जमध्ये मोहसिन शेख गंभीर जखमी झाला होता.

सुरज सावंत

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह टिका केल्यानंतर राणेंच्या जुहू येथील घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसेनेचे युवा सैनिक (yuva sena) एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. (clash) या वेळी परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

या लाठीचार्जमध्ये मोहसिन शेख गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात त्याच्या भेटीसाठी शिवसेनेतील बड्या नेत्यांनी धाव घेतली होती. याच मोहसिनची आता युवासेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. युवा सेनेचा ढाण्या वाघ असे म्हणत वरूण सरदेसाई यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

नारायण राणेंच्या त्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. नारायण राणेंच्या विधानाविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी (shivsainik) आक्रमक होत, हिंसक आंदोलन (protest) केली. कुठे नारायण राणेंच्या पोस्टरला काळं फासलं, कुठे पोस्टर फाडली, प्रतिकात्मक पुतळण्याचे दहन केले. काही ठिकाणी भाजपा कार्यालयांवर हल्ले केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

ग्लोबल स्टार राम चरण याच्या हस्ते आर्चरी प्रीमियर लीगचा दणदणीत शुभारंभ

Hill Station Travel Tips: पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाताय? मग ट्रॅव्हल बॅगमध्ये नक्की पॅक करा 'या' महत्वाच्या वस्तू

Latest Marathi News Live Update : खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार – चंद्रशेखर बावनकुळे

Jalgaon News : रेमंड चौकात मृत्यूशी झुंज! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला लोकांनी डावलले; 'खाकी' वर्दीतील देवदूतांनी वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT