Cancer 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी

सकाळन्यूजनेटवर्क

मागील वर्षी सुमारे ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव
मुंबई - राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचा ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळले असून, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली. 

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह काही सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवरील उपचारांच्या सुविधेबाबत आमदार डावखरे यांनी प्रश्न मांडला. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘राज्यात २०१९ मध्ये ५ हजार ७२७ रुग्णांचे मृत्यू झाले. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी येथील केमोथेरपी केंद्रात जानेवारीपर्यंत ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.’’ 

होप ऑफ लाइफ संस्थेने राज्यात तीन हजार रुग्णांमागे एक तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे म्हटले होते, याबाबत आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्या वेळी मंत्री टोपे यांनी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे मान्य केले. मात्र, होप ऑफ लाईफने राज्यात असंसर्गजन्य आजाराबाबत अभ्यास केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘राज्यातील ११ जिल्ह्यांतील केमोथेरपी केंद्रातील फिजिशियन व स्टाफ नर्स यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे एक महिन्याचे केमोथेरपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आत्तापर्यंत १६ जिल्हा रुग्णालयांतील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले असून, २०२०-२१ पर्यंत उर्वरित जिल्ह्यातील फिजिशियन व स्टाफ नर्सला प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे,’’ असे राजेश टोपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Energy Drink Action : पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्यांना तुकाराम मुंढेंचा तगडा दणका; 'एनर्जी ड्रिंक' शब्द लिहल्यास थेट कारवाई

Viral Video : पुण्यात झाडांना भर पावसात टँकरने पाणी... व्हिडिओ व्हायरल, पण सत्य काय?

Latest Marathi Live Update: पोह्यात आळी, भातात झुरळ; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर वसतिगृहाच्या भोजनालयावर कठोर कारवाई

Kolhapur Rain Update : राजारामसह सात बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला; धरणक्षेत्रात कोसळधार, पंचगंगेची पातळी किती फुटांवर?

Sugar Factory : साखर कारखान्यांना दराचा गोडवा; आठवडाभरात ओलांडला प्रतिक्विंटल चार हजारांचा टप्पा

SCROLL FOR NEXT