sarpanch sakal
महाराष्ट्र बातम्या

भरणीतील चिठ्ठ्यांमधून निघणार OBC आरक्षण! सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक असेल अशा ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील व्यक्तींसाठी सरपंचाची पदे तहसीलदारांच्या आदेशाद्वारे राखून ठेवली जाणार आहेत. ही कार्यवाही करताना मागील सर्व (उदा-१९९५, २०००, २००५, २०१०, २०१५, २०२०) निवडणुकीत आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती वगळल्या जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सरपंचासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण काढल्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. २००५, २०१०, २०१५ व २०२० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती व सध्याच्या आरक्षणाच्या वेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्या पहिल्या भरणीत (नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी) ठेवल्या जाणार आहेत. पहिल्या भरणीतून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित करून दिलेल्या जागांच्या संख्येइतक्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. या चिठ्ठ्या दुसऱ्या भरणी ठेवून त्यातून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षणाच्या संख्येइतक्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांसाठी मंगळवारी (ता. १५) दुपारी १२ वाजता तालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. या प्रक्रियेची नियमावलीही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक असेल अशा ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील व्यक्तींसाठी सरपंचाची पदे तहसीलदारांच्या आदेशाद्वारे राखून ठेवली जाणार आहेत. ही कार्यवाही करताना मागील सर्व (उदा-१९९५, २०००, २००५, २०१०, २०१५, २०२०) निवडणुकीत आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती वगळल्या जाणार आहेत.

आरक्षण निश्चित करताना लगतच्या निवडणुकीतील आरक्षण ध्यानात घेऊन आळीपाळीने आरक्षण देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. पहिल्या भरणीत राहिलेल्या सर्व चिठ्ठ्या हया खुल्या प्रवर्गासाठी राहतील. सर्वसाधारण महिलांसाठी जागा निश्चित करताना २०२० मध्ये जाहीर झालेले आरक्षण लक्षात घेऊन स्त्रियांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असून उर्वरित ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे घोषित केले जाणार आहे.

‘अशी’ असणार चिठ्ठी अन् प्रक्रिया

सोडतीसाठी वापरल्या जाणाऱ्या चिठ्ठ्या या सारख्याच आकाराच्या असाव्यात. त्यावर ग्रामपंचायत सरपंच सोडत २०२५ असे नमूद करावे. त्याखाली ग्रामपंचायतीचे नाव व सोडतीची तारीख असणार आहे. ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित दिलेली आहे, ते लिहिण्यासाठी पुरेशी जागा असणार आहे. सोडत काढून झाल्याबरोबर चिठ्ठीवर आरक्षण नमूद करावे, चिठ्ठीच्या मागे तहसील कार्यालयाचा गोल शिक्का उमटविण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी निश्चित करून दिलेल्या नियमाव्यतिरिक्त इतर कोणतेही नियम अथवा तर्कवितर्क लावून आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढू नयेत, अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायती

मंगळवारी (ता. १५) काढल्या जाणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये करमाळ्यातील १०८, माढ्यातील १०८, बार्शीतील १२९, उत्तर सोलापूरमधील ३६, मोहोळमधील ९०, पंढरपूरातील ९५, माळशिरसमधील १०३, मंगळवेढ्यातील ७९, सांगोल्यातील ७६, दक्षिण सोलापूरमधील ८३ आणि अक्कलकोट तालुक्यातील ११८ ग्रामपंचायती आहेत. २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या निवडणुकीसाठी हे आरक्षण वापरले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Caseराधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT