महाराष्ट्र बातम्या

Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू होणार? ; कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर असलेल्या सरकारी कर्मचारी संघटनेने आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर युनियनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात कर्मचारी संघटनेची बैठक बोलावली होती. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. 

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परतणार आहे.

आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवेदन वाचून दाखवले. एकनाथ शिंदे म्हणाले, आज माझ्या समवेत संबंधित संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT