Anil Parab  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण एक पर्याय; एसटी संपावर अनिल परबांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील लालपरी थांबलेली आहे. एसटी कर्मचारी आणि सरकार यावर काय तोडगा काढतंय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. असं असलं तरी अद्याप यावर काहीही तोडगा निघालेला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची बाब बोलून दाखवली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणालेत की, सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हा देखील एक पर्याय आहे. मात्र, या खासगीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही. इतर राज्यांमधल्या परिवहन मंडळांचा अभ्यास करुन आपण आपल्या राज्यांबाबत निर्णय घेऊ. याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

एसटी खासगीकरणाचा विचार आम्ही केलेला नाही. मात्र, वेगवेगळे जे पर्याय असतात त्यामधील एक पर्याय तो देखील असतो. मात्र, याबाबत सध्या विचार केला नाहीये. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून लोकांची जबाबदारी जशी आमची आहे तशीच कामगारांचीही आमची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप, कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश, आता कारवाई अटळ

KDMC Bus: प्रवाशांची आर्थिक लूट थांबणार! सह्याद्रीनगर ते कल्याण स्थानक बस पुन्हा धावली; आता १० रुपयांत प्रवास

वकीलासोबत मोठा गेम! मेव्हणा म्हणून घरी आसरा दिला, पण तोच पत्नीचा प्रियकर निघाला, नंतर नको ते घडलं

Latest Marathi News Live Update : भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! टीएमटी बस भाडे वाढणार; मोठ्या आर्थिक संकटामुळे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT