MPSC
MPSC 
महाराष्ट्र

भरती प्रक्रियेसाठी Only MPSC; मंत्र्यांवर ई-मेल, मेसेज आणि सोशल मीडियातून भडिमार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोग्य विभागातील पदभरती परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी "आता नाही तर कधीच नाही" ही ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आली. शासकीय भरतीसाठी ‘ओन्ली एमपीएससी’ ही मागणी लावून धरली आहे. त्यासाठी राज्यातील मंत्र्यांना ई-मेल, मेसेज आणि सोशल मीडियावरून मागण्यांचा भडिमार केला जाणार आहे.

मंगळपासून (ता. ९) सुरू झालेली ही ऑनलाईन मोहीम १४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आरोग्य विभागाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून राज्यभरात ‘गट क’च्या पदांसाठी परीक्षा घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात देखील उमटले आहेत. या पूर्वीपासून सर्व प्रकारची शासकीय पदभरती ‘एमपीएससी’मार्फत केली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात आहे. ‘एमपीएससी’ने देखील यासाठी तयारी दर्शविली आहे. मात्र, सरकारकडून तसा निर्णय घेतला जात नाही.

आरोग्य विभागातील भरती घोटाळा समोर आल्याने याविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांसह सोळा जणांना ई-मेल आणि मेसेजद्वारे विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांना टॅग करून याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ती एमपीएससीकडूनच घ्यावी, २०२१ वर्षातील पदभरतीसाठी जागा काढाव्यात, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशा मागण्या केल्याचे एमपीएससी स्टुटंड्स राइटसचे प्रतिनिधी महेश बडे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT