Oxygen  sakal
महाराष्ट्र बातम्या

ऑक्सिजनची मागणी ४२४ टनांवर

कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्ग वेगाने(Corona) पसरत असल्याने ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. परिणामी ऑक्सिजनची(Oxygen) मागणीही वाढली आहे. सध्या राज्यात दैनंदिन ऑक्सिजनची मागणी ४२४ टनांवर पोचली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ऑक्सिजनची मागणी २७० ते ३०० टन होती.

मुंबईत रविवारी (ता.९) १८ हजार ४७४ रुग्ण सापडले. त्यातील ११८ जणांना ऑक्सिजन खाटांची गरज भासली. सध्या ३०३५ रुग्ण ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत आहेत. राज्यातही सक्रिय रुग्णांचा आकडा दोन लाख दोन हजार २५९ वर पोहचला आहे. उपचाराधीन रुग्ण वाढले तर ऑक्सिजन खाटांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा प्राणवायूची मागणीही वाढणार असल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती कोरोना बाधितांवरील उपचारासाठी सरकारला इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात आले. त्यामुळे राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.

बाराशे टन ऑक्सिजनचे प्रकल्प

कोरोनाची तिसरी लाट येणारच असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिसरी लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनचीही गरज भासण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून राज्यभरात सहा हजार टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. शिवाय १२०० टन ऑक्सिजनचे मोठे प्रकल्प तयार करण्यात येत आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT